© २०१३ श्री भार्गव फायबर्स
१९९० सालापासून श्री भार्गव फायबर्स हे बांबू वाढवण्यात आणि त्याचे नवे नवे उपयोग विकसित करण्यात मग्न आहे.
शेडाणीबद्दल
शेडाणी हे गाव महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात ६०० मीटर उंचीवर वसलेले आहे. तेथे भरपूर पाऊस पडतो आणि हा पाण्याचा ओघ मुळशी धरणाकडे जातो.
ह्या नैसर्गिक परिस्थितीत बांबूची वाढ उत्तम होते.
गावात मुख्यतः शेतकऱ्यांची वस्ती आहे. इथले मुख्य पीक हे पावसाळ्यातील भातशेती आहे. पावसाखेरीज दुसरा काही पाणीपुरवठा उपलब्ध नाही. ह्या ग्रामस्थांना बांबूची शेती करणे, बांबूची कापणी करणे आणि उपचार करून वेगवेगळी उत्पादने बनवणे ह्यासंबंधी प्रशिक्षण मिळाल्यानंतर चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे, व यामुळे ते शहराकडे नोकरीसाठी धावत नाहीत.
शेडाणीला श्री भार्गव फायबर्स यांच्या वतीने बांबूच्या ४ स्थानिक जाती निवडून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने बनवली जाऊ लागली. आरंभी खुर्ची, दिवाण, पलंग, टेबल, सोफा इत्यादी फर्निचर बनवले. यामुळे आम्हाला बांबू हाताळण्याचा सराव झाला.
नंतर विणकाम करून टोपल्या, करंड्या आणि इतर काही कारागिरीचे हस्तोद्योग सुरू केले.
उपचार (ट्रीटमेंट) केल्यानंतर बांबू टिकाऊ आणि हवामानाला तोंड देणारा बनू शकतो. त्यानंतर लागलीच काही जातींचे बांबू गोठे, हरितगृह, तात्पुरते निवारे अशा छोट्या-छोट्या बांधकामांसाठी वापरता येतात.
आम्ही ताकत या बांबूच्या खास वैशिष्ट्यावर भर देण्याचे ठरवले. आधुनिक राळी (रेझिन) वापरून बांबूला योग्य ते आकार देण्याचे तंत्र साधून घेतले.
यामुळे आकारातील अनावश्यक बदल, कुजणे आणि कीड लागणे हे टाळले गेले.
आमच्याबद्दल